डी. बी.पाटील शैक्षणीक विचार मंच कोल्हापूर- शैक्षणिक समाचार पत्रिका
डी. बी.पाटील शैक्षणिक विचारमंचच्या मागण्याना शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचा सकारात्मक प्रतिसाद
डी.बी.पाटील शैक्षणिक विचार मंच कोल्हापूर व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापुर यांच्या सोबत दि.०६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सहविचार सभेमध्ये शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना नूतन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
माननीय शिक्षणाधिकारी यांच्या सोबत झालेल्या सहविचार सभेचा विषयवार इतर तपशील खालीलप्रमाणे.
1. डी.बी.पाटील यांनी तयार केलेल्या आदर्श कार्यालयीन कामकाज पद्धतीची प्रत आपल्याकडे द्या त्याची निश्चितपणे अंमलबजावणी केली जाईल.
2. शासन/माननीय आयुक्त पातळीवरील प्रश्न स्वतंत्रपणे डी.बी. पाटील विचार मंचच्या लेटरपॅडवर द्यावेत ते योग्य त्या अभिप्रायासह संबंधितांकडे पाठवून देऊ.
3. संच मान्यता दुरुस्ती संचालक स्तरावरून होत असलेले हे काम सध्या तेथे सुरू आहे.
4. मुख्याध्यापक व लिपिक त्यांच्यासाठी लवकरच कार्यशाळांचे आयोजन केले जाईल.
5.MMMS निकालाबाबत आलेल्या तक्रारी माननीय आयुक्त परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल.
6. वेतन पथकाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणाबाबत संबंधितांशी चर्चा करून लवकरच त्याची निर्गत करू.
7. कोविड योद्धा म्हणून ड्युटी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेची सेवा- पुस्तकी नोंद घ्यावी.तसेच शिक्षकांनी ड्युटी सुट्टीच्या कालावधीत केली असल्यास त्याच्या बदली रजा देण्यासंबंधी मा. शिक्षण आयुक्त पुणे यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे त्यानुसार कार्यवाही करू.
8. 18 जुलै 2021 पूर्वी चे वरिष्ठ निवड श्रेणी प्रस्ताव प्रशिक्षणाशिवाय हमीपत्राच्या आधारे दिले जातील.
9. एन एम एम एस पास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे स्वतंत्रपणे गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यासाठी परीक्षा परिषदेकडे पाठपुरावा करू.
10. मुख्याध्यापक व लिपिक यांच्यासाठी लवकरच तंत्रस्नेही प्रशिक्षणाचे आयोजन करू. यामधून ऑनलाइन माहिती भरणे तसेच विविध पोर्टल हाताळण्याची माहिती देऊ.
11. नियमीत व प्रभारी मुख्याध्यापक प्रस्ताव मंजुरी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
12. वेतनेतर अनुदान मिळण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरू केली जाईल असे सांगितले.त्याचबरोबर विविध शैक्षणिक प्रश्नावर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला
सहविचार सभेमध्ये स्वागत व प्रास्ताविक मंचचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जी.पोवार यांनी केले तर प्रश्नांची मांडणी डॉ. ए.एम. पाटील यांनी केली.डी.बी. पाटील शैक्षणिक विचार मंचच्या शिष्टमंडळा मध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड, राज्य मुख्याध्यापक महामंडळ सदस्य डॉ.बी.बी. पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष के.बी.पोवार, मंचचे उपाध्यक्ष डॉ. डी एस घुगरे, एस.के. पाटील, सचिव आर वाय पाटील, सहसचिव प्राचार्य ए.एस.रामाने, सदस्य जयसिंग पोवार, रंगराव तोरसकर, दत्तात्रय जाधव, चंदगड तालुका अध्यक्ष आर आय पाटील, करवीर तालुका अध्यक्ष मनोहर पोवार, पन्हाळा तालुका अध्यक्ष पी.एस. पाटील यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment